Dattatraya Lohar waiting for Mahindra bolero | दत्तात्रय पाहतोय महिंद्रा' यांच्या बोलेरोची वाट | Sakal Media
देवराष्ट्रे (कडेगाव) : काही दिवसापूर्वी देवराष्ट्रेच्या दत्तात्रय लोहार यांनी मिनी जिप्सी तयार केली. याचे कौतुक सोशल मीडियावर तर झालेच शिवाय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील दखल घेतली. या कारागिराने बनवलेल्या गाडीच्या बदल्यात मी त्यांना बोलेरो गाडी देईन व त्यांची गाडी कंपनीच्या रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शनास ठेवीन, असे ट्विट करत दत्तात्रय लोहार यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली आहे. मात्र सोशल माडियावर त्यांनी ही आॅफर नाकारल्याची अफवा पसरत आहे. यामगे नेमके कोणते सत्य आहे हे दैनिक सकाळ शी बोलताना दत्तात्रय यांनी सांगितले आहे. (बातमीदार: स्वप्नील पोवार)
#Sangli #AnandMahindra #DattatrayaLohar #minigypsy #SocialMedia #Viral #fourwheeler